छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, अन्…’ बागेश्वर बाबाच्या वक्तव्याने पेटला वाद, नेमकं प्रकरण काय?
काल नागपूरमध्ये भारदुर्गा शक्तिस्थळ शिलान्यास कार्यक्रमात धीरेंद्र कृष्ण शास्त्री बोलत होते. या दरम्यान त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वाद पेटला आहे. बागेश्वर बाबा नेमकं काय म्हणाले?
आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. हा वाद ताजा असतानाच त्यात बागेश्वर बाबाच्या वक्तव्याची भर पडली आहे.
काल नागपूरमध्ये भारदुर्गा शक्तिस्थळ शिलान्यास कार्यक्रमात धीरेंद्र कृष्ण शास्त्री बोलत होते. या दरम्यान त्यांनी “छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, स्वामी रामदास महाराज जवळ गेले, आता युद्ध लढणार नाही असे सांगितले, आणि राजपाट सांभाळण्यास सांगितले. रामदास स्वामींनी सांगितले की, ‘ठीक आहे, आता हे राज्य माझे आहे. शिष्याचा धर्म आहे गुरुच्या आज्ञेचे पालन करणं. त्यामुळे माझी आज्ञा ऐका आणि माझ्या राज्याचे संचालन करा’” असे विधान केले. याच मुद्द्यांवर वाद पेटला आहे.
या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर आणि संत मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना धीरेंद्र शास्त्री यांनी आरएसएसचं कौतुकही केलं होतं.
Published on: Apr 25, 2026 10:51 AM
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...

