Lok Sabha Election Result 2024 : सुरूवातीच्या कलांमध्ये अजित पवारांना मोठा धक्का, बारामतीही हातातून जाणार?
राष्ट्रवादी पक्षात मोठी फूट पडल्यानंतर बारामतीतील लोकसभा निवडणूक ही पहिलीच होती. इतिहासात पहिल्यांदाच पवार विरूद्ध पवार असा सामना बारामती लोकसभा मतदारसंघात पाहिला मिळाला. त्यामुळे राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अजित पवार यांचा मतदार संघ असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी लीड मिळाली आहे. तर दुसरीकडे अजित पवार गट कुठेही आघाडीवर नसल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी पक्षात मोठी फूट पडल्यानंतर बारामतीतील लोकसभा निवडणूक ही पहिलीच होती. इतिहासात पहिल्यांदाच पवार विरूद्ध पवार असा सामना बारामती लोकसभा मतदारसंघात पाहिला मिळाला. त्यामुळे राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दरम्यान आज बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू असताना सुप्रिया सुळे या आघाडीवर असल्याचे दिसतंय तर सुनेत्रा पवार या पिछाडीवर आहेत. सध्या आलेल्या अपडेटनुसार, सुप्रिया सुळे या ६ हजार ९४१ मतांनी आघाडीवर आहेत.
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर

