Baramati | बारामती नगरपालिकेला दोन महिने मुख्याधिकारीच नाही

कोविडच्या पार्श्वभूमीवर बारामती नगर परिषदेची वसूलीची स्थिती दयनीय आहे. अशावेळी दोन महिन्यापासून मुख्याधिकारीच नसल्यानं आता शहरात चर्चेचा विषय बनला आहे. मागील काही दिवसांपासून बारामतीत कोविडची स्थितीही चिंताजनक बनू लागली आहे.

बारामती : मागील 2 महिन्यांपासून बारामती नगर परिषदेला मुख्याधिकारीच मिळत नसल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे नगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर बारामती नगर परिषदेची वसूलीची स्थिती दयनीय आहे. अशावेळी दोन महिन्यापासून मुख्याधिकारीच नसल्यानं आता शहरात चर्चेचा विषय बनला आहे. मागील काही दिवसांपासून बारामतीत कोविडची स्थितीही चिंताजनक बनू लागली आहे. ग्रामीण भागातील तपासण्यांची संख्या लक्षणीय असताना बारामती शहरातील तपासण्या खूपच कमी आहेत. स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या सूचना केलेल्या होत्या. मात्र, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बारामती नगर परिषदेला मुख्याधिकारी नसल्याने कोरोना चाचण्यांबाबत मोठी उदासिनता पाहायला मिळत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI