सुरेश धस यांनी केलेल्या ‘त्या’ आरोपांची थेट अजित दादांकडून पडताळणी अन्…
सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांवर चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र याबाबत कागदपत्र घेऊन अविनाश पाठक आणि अजित पवार यांची भेट घेतली आहे.
बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी आरोप केला आहे. सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांवर चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र याबाबत कागदपत्र घेऊन अविनाश पाठक आणि अजित पवार यांची भेट घेतली आहे. बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी मंत्रालयात अजित पवार यांची भेट घेतली. बीड जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून जिल्हा नियोजन समितीच्या कामात भ्रष्टाचार झाला होता, असा आरोप सुरेश धस यांनी केला होता. या आरोपांची चौकशी करण्यासाठी अजित पवार यांनी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. त्याची कागदपत्रे घेऊन बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अजित पवार यांनी मंत्रालयात बोलावले होते.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल

ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान

सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती

'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
