‘जितेंद्र आव्हाडांना फक्त रॉकेल टाकायचाच धंदा…’, सुरेश धस भडकले, कशावरून जुंपली?
सरपंच हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूप्रकरणावरून सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड आतापर्यंत मोर्चात एकत्र दिसायचे. मात्र आता या दोघांमध्ये जुंपली आहे. सूर्यवंशी प्रकरणात पोलिसांना काही गोष्टींवरून माफ करा, असं सुरेश धस म्हणालेत. तो व्हिडिओ आव्हाडांनी ट्विट केला. त्यानंतर धस आणि आव्हाड आमनेसामने आलेत.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूप्रकरणावरून मोर्चामध्ये एकत्र राहिलेले आव्हाड आणि सुरेश धसांमध्ये जुंपली आहे. सोमनाथ सूर्यवंशींचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप आहे. पण पोलिसांवर गुन्हे दाखल होण्यासाठी आग्रह करू नका. काही गोष्टी माफ करावं असे धस म्हणाले. हाच व्हिडिओ आव्हाडांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यावरून आता आव्हाडांना रॉकेल टाकण्याचाच धंदा कळतो का? अशी टीका सुरेश धसांनी केली. तर आपली अर्धवट क्लिप दाखवून मिडीया ट्रायल केल्याचा आरोप सुरेश धसांनी आव्हाडांवर केला. त्यानंतर पुन्हा आव्हाडांनी धसांची अॅक्टिंग करून निशाणा साधला. सोमनाथ सूर्यवंशींचा न्यायालयाने कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणावरून पोलिसांवर कारवाई व्हावी यासाठी परभणीहून मुंबईच्या दिशेने लॉंग मार्च निघाला होता. मात्र मुंबईत मोर्चा येण्याआधी शनिवारी मंत्री मेघना बोर्डेकर आणि सुरेश धसांनी मोर्चेकऱ्यांशी चर्चा केली. आणि हा मोर्चा स्थगित झाला. त्यावरून आव्हाडांनी सुरेश धसांवर मोर्चा रोखल्याचा आरोप करत सरकारची दलाली केल्याची टीका केली आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल

ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान

सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती

'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
