Dhananjay Munde supporters Video : ‘कार्यकर्ते गुन्हे करतात त्याची शिक्षा साहेबांना का?’, राजीनाम्यानंतर मुंडे समर्थक नाराज
धनंजय मुंडे यांचे पीए राजीनाम्याची एक प्रत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय सागर या बंगल्यावर दाखल झाले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्री धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा सोपवल्याचे काल पाहायला मिळाले. तर फडणवीसांनी तो स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना अखेर 82 दिवसानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. दरम्यान, धनंजय मुंडे यांची मंत्री पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर आता मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आणि मनोज जरांगेंनी केली आहे. वाल्मिक कराड आणि गँगवर जे हत्येचे गुन्हे दाखल झाले त्यात धनंजय मुंडेंनाही सह आरोपी करा अशी मागणी सुरु झाली आहे. धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी करतानाच विरोधकांनी सातपुडा बंगल्यावरील बैठकीवरून आरोप केला आहे. मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळासह राज्यभरात एकच चर्चा होती. मात्र धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील मुंडे समर्थकांकडूनच धनंजय मुंडेंचा राजीनामा होणं ही चुकीचं गोष्ट झाल्याचे सांगण्यात येत आहे. बघा काय म्हणाले मुंडेंचे समर्थक आणि परळीकर?

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
