Dhananjay Munde Video : हकालपट्टीनंतरही सुटका नाही, ‘त्या’ खंडणीची बैठक मुंडेंच्या बंगल्यावरच! राजीनाम्यानंतर विरोधकांची मागणी काय?
धनंजय मुंडे यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी केल्यानंतर आता विरोधकांनी सह आरोपी करण्याची मागणी केली आहे. ज्या खंडणीतून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्या खंडणीची बैठकच मुंडे यांच्या बंगल्यावर झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंना सह आरोपी करा अशी मागणी आव्हाडांपासून ते सुरेश धस आणि जरांगे यांनी देखील केली आहे.
धनंजय मुंडे यांची मंत्री पदावरून हकालपट्टी झाली पण आता मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आणि मनोज जरांगेंनी केली आहे. वाल्मिक कराड आणि गँगवर जे हत्येचे गुन्हे दाखल झाले त्यात धनंजय मुंडेंनाही सह आरोपी करा अशी मागणी सुरु झाली आहे. धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी करतानाच विरोधकांनी सातपुडा बंगल्यावरील बैठकीवरून आरोप केला आहे. त्या बैठकीचा उल्लेख आक्रोश मोर्चातून भाजपचे आमदार सुरेश धसांनी केला आहे. १९ ऑक्टोबरला मुंबईच्या धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावर बैठक झाल्याचं धसांचं म्हणणं आहे. या बंगल्यावर वाल्मिक कराड, नितीन बिक्कड, अनंत काळकुटे, आव्हाड कंपनीचे शुक्ला नावाचे अधिकारी होते. पवन चक्कीच्या आवादा कंपनीकडून मुंडेंनीच फोनवरून तीन कोटी मागितल्याचा आरोप आहे. तीन कोटी देण्यास कंपनीने नकार दिल्याने दोन कोटी डील ठरली आणि त्यापैकी ५० लाख मिळाल्याचाही धसांचा आरोप आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा सुरेश धसांनी सातपुडा बंगल्यावरील बैठकीवर आपण ठाम असल्याचं म्हटलंय आणि पुढच्या आरोपपत्रात सह आरोपी यायला हवे असं सूचकपणे म्हटलं आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी आरोपींनी व्हिडिओ शूटिंग केलंच पण आका म्हणजे वाल्मिक कराडला फोन केल्याचा आरोप आहे. मात्र त्याच वेळी वाल्मिक कराडने धनंजय मुंडेंनाही फोन केला असं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

