बीडमध्ये मुंडेंच्या हत्येचा थरार! असंख्य वार, गळा चिरला…; शवविच्छेदन अहवाल समोर
महादेव मुंडे यांच्या हत्येनंतर आता त्यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
परळीत सुमारे 20 महिन्यांपूर्वी महादेव मुंडे यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. मात्र, या खुनाच्या प्रकरणात अद्याप एकाही आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. आता महादेव मुंडे यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून, त्यातून या हत्येची क्रूरता स्पष्ट झाली आहे. गुन्हेगारांच्या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. परळीतील या खून प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल हाती लागला असून, त्यातून अंगावर शहारे आणणारी माहिती समोर आली आहे. अहवालात सांगितल्या प्रमाणे महादेव मुंडे यांच्यावर अत्यंत क्रूरपणे हल्ला करण्यात आला होता. त्यांची श्वसननलिका कापली गेली, तसेच मुख्य रक्तवाहिन्यांवर खोलवर वार करण्यात आले. त्यांच्या मानेवर, हातावर, तोंडावर आणि शरीराच्या इतर भागांवर एकूण 16 वार झाले होते. त्यांचा चेहरा, छाती, दोन्ही हात आणि शरीर रक्ताने माखलेले होते. प्रथम त्यांचा गळा कापण्यात आला, यातील एक वार 20 सेमी लांब, 8 सेमी रुंद आणि 3 सेमी खोल होता. त्यानंतर त्यांच्या मानेच्या उजव्या बाजूला चार वार करण्यात आले. विशेष म्हणजे, प्रतिकार करताना त्यांच्या हातांवरही जखमा झाल्याचे अहवालात नमूद आहे.
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला

