Phaltan Doctor Death Case : बीड ते परळी मार्ग ठप्प, सर्वपक्षीय नेते अन् संघटना रस्त्यावर, कडकडीत बंद… नेमकं घडतंय काय?
फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी न्याय मिळण्याच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील वडवणी शहर आज बंद ठेवण्यात आले आहे. आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्वपक्षीय संघटनांकडून होत आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या निषेधार्थ बीड जिल्ह्यातील वडवणी शहर आज कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, सर्व पक्ष आणि संघटनांनी बंदचे आवाहन केले आहे. अहवालानुसार, संबंधित महिला डॉक्टरने फलटण येथे एका हॉटेलच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्या सुसाईड नोटमध्ये दोन आरोपींची नावे नमूद करण्यात आली आहेत. गोपाल बदने आणि प्रशांत बुनकर अशी आरोपींची नावे समोर आली आहेत. केवळ या दोघांवरच नव्हे, तर छळ करणाऱ्या इतर लोकांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.
आज सकाळी वडवणी शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. आरोपींवर जलदगतीने आणि कठोर कारवाई व्हावी, तसेच या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी एसआयटी (विशेष तपास पथक) गठीत करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी तीव्र भावना व्यक्त केली जात आहे.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

