Walmik Karad : तू कोण रे XXX.. वाल्मिक कराडची कोणाला शिवीगाळ? कॉल रेकॉर्डिंग व्हायरल अन्…
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मास्टर माईंड वाल्मीक कराड सध्या जेलमध्ये आहे. याच वाल्मिक कराडची एक कॉल रेकॉर्डिंग समोर आली असून हा ऑडिओ चांगलाच व्हायरल होतोय.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडची आणखी एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. पैशाच्या वादातून वाल्मिक कराडने एका तरूणाला जातीवाचक शिवीगाळ केल्याची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. ‘आता सगळ्यांनाच मध्ये घेतो.. तू कोण रे कुत्रा.. ‘, अशा प्रकरणाची भाषा वापरत जातीवाचक शिवीगाळ केली आहे. समोरच्या व्यक्तीने कामासाठी लाखो रुपये दिले होते. मात्र ते वाल्मिक कराड परत देत नसल्याने तरुणाने वारंवार फोन केल्याची माहिती आहे. याचाच वाल्मिक कराडला राग आला आणि त्याने थेट जातीवाचक शिवीगाळ केली. याचीच एक धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. दरम्यान, या कॉल रेकॉर्डिंग संदर्भात वाल्मिक कराडचे जुने सहकारी विजयसिंह (बाळा) बांगर याने खळबळजनक दावे देखील केले आहे.
या कॉल रेकॉर्डिंग संदर्भात वाल्मीक कराडचे जुने सहकारी विजयसिंह (बाळा) बांगर यांनी बोलताना सांगितले की, एका व्यक्तीने वाल्मिक कराडकडे कामासाठी 25 लाख रुपये दिले होते. मात्र तो परत देत नसल्याने वारंवार फोन केला होता त्याचा राग आला आणि यानंतर त्याला बोलावून घेऊन पाच लाख रुपये दिले आणि खंडणीच्या गुन्ह्यात अडकवले.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

