Sanjay Raut : फडणवीसांना GR काढायची एवढीच हौस आहे तर एक… ठाकरेंवरील टीकेवरून राऊतांचा पलटवार
'तुमच्या मिस्टर प्रधानमंत्रींना सांगा ज्या इंटरनॅशनल स्कुल परदेशातून तुम्ही देशात आणताय. ज्याला संघाची विरोध आणि मागणी आहे. त्या बंद करून टाका, एक उत्तम जीआर महाराष्ट्रात काढा आणि इंटरनॅशनल स्कुलचा जो धंदा आहे. तो बंद करा', असं म्हणत राऊतांनी फडणवीसांवर घणाघत केलाय.
हिंदीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर भाषणातून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकून भारतीय भाषांना विरोध केला जातो, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर केली. हिंदी भाषेवरून राजकारण सुरू असताना बॉम्बे स्कॉटिशमध्ये आदित्य ठाकरे यांचं शिक्षण झालं असून याचा धागा पकडून फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. ‘आम्हाला भारतीय भाषेचा अभिमान आहे. इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकलीच पाहिजे. त्याला विरोध नाही पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या, बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकायचं आणि भारतीय भाषांना विरोध करायचा हे सहन करणार नाही’, असं फडणवीस म्हणाले. तर या टीकेवर पलटवार करताना संजय राऊत म्हणाले, फडणवीसांना एवढी जीआर काढण्याची हौस आहे तर त्यांनी एक जीआर काढून इंटरनॅशनल शाळा बंद करा, असे म्हटलं आहे.