Beed : ‘साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीनं..’, बीडमध्ये तरूणीचं टोकाचं पाऊल आईनं लिहिलं शिंदेंना पत्र
'धाराशिव सिटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद आहे. तुम्हीच आम्हाला न्याय देऊ शकता यावर ठाम विश्वास आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी चुकीचं काम केलं. पोलीस उपअधीक्षक स्वप्नील राठोडांनी कसलाही जबाब घेतला नाही. उलट आम्हाला अपमानित केलं', बीडमधील तरूणीच्या आईने पत्रात असंही सांगितलं.
बीडच्या तरुणीने छेडछाड आणि ब्लॅकमेलला कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी समोर येत आहे. याप्रकरणी आरोपी अभिषेक कदमला अटक केली असून त्याला लगेच जामीनही देण्यात आला आहे. कालच्या दिवशीच या तरुणीचं लग्न देखील होतं. मात्र त्याआधीच तरुणीने माम्याच्या घरात गळफास लावून जीवन संपवलं. या तरुणीच्या आईने उपमुख्यमंत्री शिंदे यांना पत्रही लिहिलं आहे. ‘साहेब, मी तुमची लाडकी बहीण. आपण मुख्यमंत्री असताना आम्हासारख्या अगणित बहिणींना भावाचा बंध मिळाला. आपण उपमुख्यमंत्री आहात, मात्र माझ्यासाठी तुम्हीच लाडक्या बहिणीचे मुख्यमंत्री आहात. माझी मुलगी साक्षी तिला हवाई सुंदरी व्हायचं होतं. मात्र एका क्षणात ती नाहीशी झाली’, असं या आईने पत्रात म्हटलं तर पुढे असेही लिहिलं काही मुलांनी तिची छेड काढली आणि साहेब तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेऊन जीवन संपवलं. तुमची भाची साक्षी या जगात परत येणार नाही. मात्र त्या क्रूर नराधमांना देखील तेवढीच शिक्षा होणे अपेक्षित आहे. आता केवळ तुमच्याकडून आम्हाला न्यायाची आस आहे. आपण आम्हाला न्याय देऊन गुंडांना शिक्षा द्याल एवढीच अपेक्षा, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं

