Central Railway : CSMT मुंबई रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या प्रवाशांचे महिनाअखेरपर्यंत होणार हाल, कारण…
कोकणातून मुंबईच्या दिशेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या महिना अखेरपर्यंत काही एक्स्प्रेस गाड्या या ठाणे आणि दादर रेल्वे स्थानकापर्यंत धावणार आहेत.
मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील अर्थात सीएसएमटी स्थानकावरील फलाटांच्या विस्तारीकरणाचं काम सुरू आहे. त्यामुळे कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे या महिना अखेरपर्यंत चांगलेच हाल होणार असल्याचं दिसतंय. कारण मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या या सीएसएमटी रेल्वे स्थानकाऐवजी आता ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत धावणार आहे. यामध्ये मंगळुरू ते मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत चालवून अंशतः रद्द करण्यात येणार आहे. यासह कोकणातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जनशताब्दी, तेजस एक्स्प्रेस या गाड्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाऐवजी दादर रेल्वे स्थानकापर्यंत धावणार आहे. तिन्ही रेल्वे गाड्यांचे अशाप्रकारे वेळापत्रक हे ३० एप्रिलपर्यंत असणार आहे. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणाच्या कामांना वेग आला असून या फलाटावर येणाऱ्या रेल्वे गाड्या इतर फलाटावर पाठवण्यात येत आहे. तर काही रेल्वे गाड्यांचा फलाच्या अभावामुळे त्यांचा सीएसएमटी थांबा रद्द करण्यात आल्या आहे. परिणामी प्रवाशांना शारीरिक, मानसिक त्रासासह आर्थिक नुकसान देखील होत आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

