Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्….हत्येचं मूळ कारण आलं समोर
बीड जिल्ह्यातील विलास घुले हत्याप्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असून, या प्रकरणाला आता आणखी गंभीर वळण मिळाले आहे. हत्येमागील कारणांबाबत धक्कादायक माहिती पुढे आली असून, एका पीडित महिलेने ब्लॅकमेल, लैंगिक अत्याचार आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि त्यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांची नावे तक्रारीत आल्याने राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एसआयटीने सौरभ सोनवणे यांची चौकशीही केली आहे.

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, उमेश माने याने तिच्यावर जबरदस्ती करून अत्याचार केला आणि त्याचे व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार ब्लॅकमेल केले. या भीतीपोटी तिच्यावर पुन्हा अत्याचार करण्यात आल्याचा आरोपही तिने केला आहे. ही बाब कुटुंबीयांना सांगितल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्याची तयारी सुरू होती. मात्र, रमेश घुले याने धमकावून तक्रार न करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महिलेने पुढे दावा केला की, 3 जून रोजी विलास घुले याने संबंध ठेवण्यास नकार दिल्यास पती आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर 20 जून रोजी विलास घुले आणि उमेश माने पुन्हा तिच्या घरासमोर येऊन शिवीगाळ व धमक्या देत होते. हा वाद मिटवण्यासाठी कुटुंबीय संबंधित ठिकाणी गेले असता, त्यांच्यावर काचेच्या बाटल्या आणि विटांनी हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर झालेल्या झटापटीत ही गंभीर घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे.
पीडित महिलेने केज आणि बीड येथे तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप अधिकृतपणे तक्रार नोंदवून घेतली नसल्याचा दावा करत न्यायाची मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित काही व्हिडिओ समोर आल्याचा दावा केला जात असून, त्यामध्ये आरोपींकडून प्रभावशाली व्यक्तींची नावे घेतल्याचेही बोलले जात आहे. तथापि, या दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. पोलिसांकडून आणि एसआयटीमार्फत प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, पुढील तपासातून नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
Published on: Jun 29, 2026 10:53 AM
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न