शिवसेना नेते संजय राऊत हे उद्या राज्यसभेसाठी अर्ज भरणार आहेत. दरम्यान त्यांनी त्यापूर्वी आज शरद पवार यांच्या निवसस्थानी जात त्यांची सदिच्छा भेट घेतली. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी सांगिते की, मी उद्या राज्यसभेचा अर्ज भरणार आहे. त्यासाठी शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली, त्यांचा आर्शिवाद घेतला. पवार हे वडिलधारे असून, महाविकास आघाडीचे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे अर्ज भरण्यापूर्वी आपण पवारांना भेटल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.