माझ्यासोबत दोनदा विश्वास घात झाला, देवेंद्र फडणवीस यांनी काय केला गौप्यस्फोट?
VIDEO | देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा महासंकल्प या 'टीव्ही 9 मराठी'च्या विशेष कार्यक्रमात केला गौप्यस्फोट
मुंबई : महाराष्ट्राचा महासंकल्प या ‘टीव्ही 9 मराठी’च्या विशेष कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीवर मोठे गौप्यस्फोट केले. माझ्यासोबत विश्वासघात दोनवेळा झाला. पहिला उद्धव ठाकरेंनी केला. त्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढल्या. आमच्यासोबत निवडून आले. निवडणुकीच्या कार्यक्रमात मोदीजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे म्हणत होते तेव्हा ते टाळ्या वाजवत होते. पण ज्यावेळी नंबर लक्षात आला की आपल्याला मुख्यमंत्री होता येईल. त्यावेळी त्यांनी माझा फोनही घेतला नाही. माझ्याशी चर्चाही केली नाही. मुख्यमंत्रीपदाची खूर्ची त्यांना इतकी प्रिय झाली की ते राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत निघून गेले. त्यामुळे एकप्रकारे विश्वासघात त्यांनी केला.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी

