Bharat Gogawale : पडद्यामागून बराचसा हस्तक्षेप, शिवसेनेच्या फुटीमागे रश्मी ठाकरेंचा हात.. गोगावलेंच्या दाव्यानं खळबळ
आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आम्ही जपत आहोत. त्यामुळे पक्षाचं नाव आणि पक्षच चिन्ह आम्हाला मिळाला आहे, असं म्हणत भरत गोगावले यांनी मोठा दावा केलाय.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना या पक्षात फूट पडली. या फुटीनंतर शिवसेना या पक्षाचे दोन गट झाले एक उद्धव ठाकरेंचा आणि दुसरा एकनाथ शिंदे यांचा… शिवसेना या पक्षाच्या फुटीची सल शिवसैनिकांच्या मनातून काही जाताना नाही. शिवसेना फुटीचा विषय निघाला तर दोन्ही गटातील शिवसैनिकांकडून काही घटना, आठवणींवर भाष्य करताना भावना आपसूक व्यक्त केल्या जातात. अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते भरतशेठ गोगावले यांनी मोठा खळबळजनक दावा केलाय. शिवसेना पक्षाच्या फुटीमागे वहिनींचा हात असल्याचा बॉम्बच गोगावलेंनी टाकलाय.
‘आम्ही शिवसेनमधून बाहेर पडायला अनेक कारण आहेत. महिलांचा कुठपर्यंत हस्तक्षेप घ्यायला पाहिजे विचार करायला पाहिजे. पडद्यामागून वहिनींचा हस्तक्षेप बराचसा होता. महाविकास आघाडीची सत्ता असताना मुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदे यांना दिलं पाहिजे होते आणि आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्री पद द्यायला नको होते. पक्षातील लोकांना संधी द्यायला हवी होती’, असं गोगावले म्हणाले. तर बाळासाहेबांच्या कामाची पध्दत आम्हाला उध्दवसाहेबांमध्ये दिसली नाही. माझ्या वाढदिवसाला बाळासाहेबांना भेटायला गेलो तेव्हा बाळासाहेब बोलले खाली बसायचं नाही. तुला खुर्ची मी देणार आहे आणि काढून घेणाराही मी आहे. बाळासाहेब गेल्यानंतरचा कारभार आम्हाला आवडला नाही, असेही गोगावले स्पष्ट म्हणाले.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला

