Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांना हातवारे करणं भोवलं! पहिले सभागृहात माफी, आता थेट विधान भवनाच्या पायऱ्यांवरच लोटांगण
भास्कर जाधव यांना सभागृहात माफी मागावी लागली आहे. त्यानंतर त्यांनी सभागृहातून बाहेर येत विधान भवनाच्या पायऱ्यांवर लोटांगण घातलं.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी गुरुवारी सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावेळी त्यांनी कथितरित्या अश्लील हातवारे केल्याचा आरोपही झाला. आज सभागृहात मंत्री शंभूराज देसाई यांनी हा मुद्दा उपस्थित करत जाधव यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. सत्ताधारी बाकावरील इतर नेत्यांनीही या मुद्द्याला पाठिंबा देत कारवाईची मागणी केली. यावर जाधव यांनी माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संभागृहतून बाहेर येत भास्कर जाधव यांनी थेट विधान भवनाच्या पायऱ्यांवर लोटांगण घेतलेलं बघायला मिळाल. यावेळी देखील त्यांनी विधान भवनाची हात जोडून माफी मागिली. त्यानंतर ते थेट पायऱ्यांना नमस्कार करायला वाकले. त्यामुळे उपस्थितांच्या मात्र भुवया उंचावल्या.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!

