ठाकरे गटाकडून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणाचं नाव फायनल? मविआ बैठकीत नेमकं काय ठरलं?
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपादासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचं नाव देखील आघाडीवर असताना ठाकरे गटाकडून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांचं नाव फायनल करण्यात आलं आहे.
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्या विधानभवनातील कार्यालयामध्ये महाविकास आघाडीची बैठक सुरू असताना ठाकरेंकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचे नाव देण्यात आले आहे. परंतु अडीच-अडीच वर्ष विरोधी पक्षनेते पद हे खालच्या सभागृहाचे असावे अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेली आहे. परंतु ठाकरे गटान ही मागणी अद्याप तरी मान्य केलेली नाही. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली. जयंत पाटील देखील या बैठकीला उपस्थित आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद देण्याची मागणी काँग्रेसची आहे, अशी माहितीही सूत्रांकडून मिळते. तर अडीच वर्ष विरोधी पक्षनेते पद हे राष्ट्रवादीलाही मिळावे अशी मागणी यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून कऱण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दुसरीकडे शरदचंद्र पवार पक्षाची मागणी जी आहे ती अडीच-अडीच वर्षाची मागणी आहे. त्याच्यामुळे आता नक्की महाविकास आघाडीमध्ये ही मागणी मान्य केली जाते का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. कारण विधान परिषदेमध्ये सध्या आपण जर पाहिलं तर अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत. परंतु वरच्या सभागृहामध्ये आम्हाला विरोधी पक्षनेतेपद मिळावे, अशी काँग्रेसची देखील आग्रही मागणी आहे. त्याच्यामुळे आता यावर काय तोडगा महाविकास आघाडीमधून काढला जातो याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.

कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती

कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप

बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
