Bhaskar Jadhav | अतिवृष्टीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने आधार द्यावा- tv9

कंबोज यांनी ट्वीट करत राष्ट्रवादीचा एक बडा नेता लवकरच जेलमध्ये जाणार असल्याचे म्हटलं होतं. मात्र त्यांनी अजित पवार यांचं नाव घेतलं नव्हतं. मात्र त्यांच्यावर आता टीकेची झोड उठली आहे

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Aug 17, 2022 | 6:01 PM

मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन आज मोहित कंबोज यांच्यामुळे चांगलेच गाजले. आज कंबोज यांनी ट्वीट करत राष्ट्रवादीचा एक बडा नेता लवकरच जेलमध्ये जाणार असल्याचे म्हटलं होतं. मात्र त्यांनी अजित पवार यांचं नाव घेतलं नव्हतं. मात्र त्यांच्यावर आता टीकेची झोड उठली आहे. यावरूनच भास्कर जाधव यांना विचारले असता. त्यांनी हे फक्त किरीट सोमय्यांजवळ आता काही उरलं नाही म्हणून दुसऱ्या माणसाला ठेवलंय असा टोला भाजपसह किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज यांना लगावला आहे. तसेच अतिवृष्टीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना आधार सरकारने द्यावा. 2021-22 मध्ये तात्कालीन उद्धव ठाकरे सरकारने महाविकास आघाडीच्या सरकारनं खूप मोठी मदत करण्याचा निर्णय हा घेतला होता. तसा विचार करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी केल्याचेही भास्कर जाधव म्हणाले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें