Bhaskar Jadhav : कोकणाचा कलंक, लाचार अन् हलकट, भास्कर जाधवांची कदमांवर चारित्र्यावरून जहरी टीका
भास्कर जाधव यांनी रामदास कदमांवर जोरदार हल्ला चढवला आहे, त्यांना सत्तेसाठी लाचार आणि कोकणाचा कलंक संबोधले आहे. बाळासाहेबांनी मंत्रीपद दिलेले असतानाही त्यांनी पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप जाधव यांनी केला. कदमांसारखा हलकट माणूस महाराष्ट्रात सापडणार नाही, असेही जाधव म्हणाले.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू असताना, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदमांवर कठोर शब्दांत टीका केली आहे. रामदास कदम हे सत्तेसाठी लाचार असून, कोकणाचा कलंक असल्याची जहरी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.
भास्कर जाधव म्हणाले की, रामदास कदमांसारखा सत्तेकरता हलकट आणि चारित्र्य नसलेला माणूस संपूर्ण महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही. हा व्यक्ती कोकणाचा कलंक आहे. शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतर रामदास कदम यांनी केलेल्या भाषणावरही जाधव यांनी आक्षेप घेतला. ते भाषण महाराष्ट्रातील कोणालाही पटलेले नाही आणि पटता कामा नये, असे जाधव यांनी स्पष्ट केले.
ज्या बाळासाहेबांनी रामदास कदम यांना सहा वेळा आमदार केले आणि मंत्रीपदही दिले, त्या बाळासाहेबांशी त्यांची निष्ठा राहिली नाही, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. “काय लायकी होती तुमची? कोण तुम्ही? काय तुमची कुवत काय होती?” असे प्रश्न विचारत भास्कर जाधव यांनी रामदास कदमांवर हल्लाबोल केला. ते स्वतःच्या सख्या भावाचे झाले नाहीत, तर इतरांचे कसे होतील, अशी टिप्पणीही जाधव यांनी केली.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

