Thane | भिवंडी – ठाणे रस्त्यावरील टोल नाका मनसे कार्यकर्त्यांनी फोडला

भिवंडी ठाणे या बीओटी तत्त्वावरील विकसित करण्यात आलेल्या रस्त्याची दुरावस्था झालेली असताना सुध्दा या रस्त्यावर टोल वसुली सुरू आहे.त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणारे वाहनचालक ,प्रवासी सर्वच त्रस्त झाले आहेत.या रस्त्यावर सध्या मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्त्याची खड्ड्यां मुळे अक्षरशः चाळण झाली असून मोठं मोठाल्या खड्ड्यां मुळे या रस्त्यावर सदैव वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकां सह प्रवाशांना करावा लागत आहे .

भिवंडी ठाणे या बीओटी तत्त्वावरील विकसित करण्यात आलेल्या रस्त्याची दुरावस्था झालेली असताना सुध्दा या रस्त्यावर टोल वसुली सुरू आहे.त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणारे वाहनचालक ,प्रवासी सर्वच त्रस्त झाले आहेत.या रस्त्यावर सध्या मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्त्याची खड्ड्यां मुळे अक्षरशः चाळण झाली असून मोठं मोठाल्या खड्ड्यां मुळे या रस्त्यावर सदैव वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकां सह प्रवाशांना करावा लागत आहे .असे असतानाही या रस्त्यावर टोल वसुली सुरू असून सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करीत असल्याने विविध राजकीय पक्षां कडून वेगवेगळी आंदोलने करून शासन यंत्रणेचे लक्ष वेधले .परंतु त्या नंतर ही या रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने गणेशोत्सवात गणपती बाप्पांचे आगमन व विसर्जन खड्ड्यांच्या रस्त्यातून करण्याची वेळ स्थानिकांवर आली .दरम्यान या रस्त्याच्या दुरावस्थे कडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकर्त्यानी एक सप्टेंबर रोजी कशेळी टोलनाका येथे सार्वजनिक बांधकाम।विभागाचे श्राद्ध घालीत मुंडन आंदोलन करून दहा दिवसात रस्ते दुरुस्ती करा अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा दिला होता त्या नंतर अनंत चथुर्दशी नंतर सोमवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास टोल नाका येथे मनसे कार्यकर्ते येणार असल्याची कुणकुण लागल्याने नारपोली पोलीस पथक बंदोबस्तावर तैनात असताना त्यांना हुलकावणी देत टोल नाक्यावर पोहचलेले मनसे जिल्हा पदाधिकारी संजय पाटील,संतोष म्हात्रे यांनी कशेळी टोल नाक्या वर हल्ला चढवीत येथील पैसे वसूल करणाऱ्या कॅबिन च्या काचा फोडून तोडफोड केली.या अचानक झालेल्या हल्ल्या पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे.विशेष म्हणजे बरोबर एक महिना आधी अंजुरफाटा खारबाव कामण रस्त्यावरील मालोडी टोलनाक्या वर मनसे कार्यकर्त्यानी हल्ला करीत तोडफोड केली होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI