AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Nasrapur Case | नसरापूर प्रकरणातील चिमुरडीच्या तोंडातून... शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर

Pune Nasrapur Case | नसरापूर प्रकरणातील चिमुरडीच्या तोंडातून… शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर

| Updated on: May 05, 2026 | 11:02 AM
Share

पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात नराधमाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली. आरोपीने दगडाने ठेचून चिमुकलीला ठार मारले इतकेच नाही, तर नंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला. ही घटना इतकी बिभत्स होती, की अंगावर काटा येईल.

पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात नराधमाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली. आरोपीने दगडाने ठेचून चिमुकलीला ठार मारले इतकेच नाही, तर नंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला. ही घटना इतकी बिभत्स होती, की अंगावर काटा येईल. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली असून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, पीडित मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला, यामध्ये एक थक्क करणारी माहिती समोर आली आहे.

पीडित मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन कॅमेऱ्या देखत होणार असल्याचं आधीच समोर आलं होतं. आता या प्रक्रियेच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित मुलीच्या तोंडात सॉक्स आढळला आहे. तिच्या छातीवरही गंभीर व्रण उमटल्याचं दिसत होतं.

नसरापूरमधील घटनेसंदर्भातील ही माहिती अत्यंत हादरवणारी असून पुढील तपासालाही वेग आला आहे. संबंधित प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

Published on: May 05, 2026 10:59 AM
Follow Us