Bhusawal : हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?
Hatnur Dam News : हतनूर धरणातून तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.
भुसावळच्या हतनूर धरणातून 4 हजार 097 क्युसेक पाण्याचा विसर्ग आज तापी नदीपात्रात सुरू आहे. यामुळे, नदीकाठच्या भागांमध्ये पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा देण्यात आला आहे.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाचे 12 दरवाजे एक मीटरने उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर पाण्याची आवक कमी झाल्याने फक्त चार दरवाजे अर्धा मीटरने उघडले होते. त्यानंतर पुन्हा आज सकाळी पाण्याची आवक पुन्हा वाढल्याने आणखी दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले. सध्या धरणाचे एकूण सहा दरवाजे उघडे असून, यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. विदर्भात सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे हतनूर धरणात पाण्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे प्रशासनाने नमूद केले आहे.
Published on: Jul 13, 2025 04:28 PM
Latest Videos
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक

