शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर’चा सपाटा, एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराकडून ठाकरे गटाला मोठं खिंडार
आतापर्यंत अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पूर्व विदर्भात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ठाकरे गट, काँग्रेस आणि मनसेला मोठं खिंडार पाडलं आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीपासून उबाठा पक्षात सुरू झालेली गळती अद्याप सूरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पूर्व विदर्भात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ठाकरे गट, काँग्रेस आणि मनसेला मोठं खिंडार पाडलं आहे. शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय किरण पांडव यांनी विदर्भात ठाकरे गटासह काँग्रेस आणि मनसेला मोठा धक्का दिला आहे. किरण पांडव यांनी शिवसेनेचं ऑपरेशन टायगर पूर्व विदर्भात यशस्वी करून दाखवले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि सेलूच्या नगराध्यक्ष स्नेहल अनिल देवतरे या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटाचे चंद्रपूर शहर प्रमुख दिपक बेले, यांच्यासह वर्ध्याचे उपजिल्हाप्रमुख अनिल देवतारे हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तर मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर सरासकर यांच्यासह नागपूर ग्रामीण जिल्हा प्रमुख दिलीप गायकवाड आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूरमधील पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
Published on: Feb 21, 2025 06:02 PM
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
