राज्यभरात महापालिका निवडणुकांचा निकाल लागला आणि महापौर नक्की कोणाचा यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय, चंद्रपूरमध्येही महापौर पदावरून एक मोठा ट्विस्ट आलाय. महापालिकेच्या निवडणुकीत चंद्रपुरात बहुमत कोणत्याच पक्षाला नाही मात्र काँग्रेस मोठा पक्ष ठरलाय तरीही काँग्रेसमधल्या गटबाजीमुळे भाजप ह्याचा फायदा घ्यायला तयारच आहे. काँग्रेसमधला नगरसेवकाचा एक गट आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय. विकासासाठी काँग्रेस गट भाजपमध्ये येणार असा विश्वास सुधीर मुनगंटीवार निर्माण केलाय.