वयाच्या 48 व्या वर्षी प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल चौथ्यांदा करणार लग्न?
खाजगी आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असणारा बिगबॉस फेम आणि प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन एक-दोनदा नाही तर चौथ्यांदा लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. ही चर्चा जोर धरू लागली ती राहुल महाजन याने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर...
मुंबई, १ डिसेंबर २०२३ : खाजगी आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असणारा बिगबॉस फेम आणि प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन एक-दोनदा नाही तर चौथ्यांदा लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. ही चर्चा जोर धरू लागली ती राहुल महाजन याने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर…या फोटोमध्ये राहुल महाजन एका महिलेसोबत दिसल्यानंतर त्याच्या चौथ्या लग्नाची चर्चा रंगली आहे. आता याच वर्षी राहुलने तिसरी पत्नी नतालिया इलिनाला घटस्फोट दिला तर वर्ष सरत असताना त्याच्या पुन्हा एकदा चौथ्या लग्नाचा विषय चर्चेचा ठरला आहे. राहुलसोबत फोटोमध्ये दिसणाऱ्या महिलेचं नाव अनास्तासिया खिझन्याक असे आहे. ‘अनास्तासिया सोबतच्या काही आठवणी’, असं कॅप्शन राहुलने या फोटोला दिलं आहे. या फोटोवर कमेंट करत अनेकांनी चौथ्या लग्नाविषयीचा अंदाज वर्तवला आहे.
Published on: Dec 01, 2023 11:06 PM
Latest Videos