Bihar Election Results 2025 : शिंदे म्हणाले, बिहारच्या लाडक्या बहिणींनी दिली लँडस्लाईड व्हिक्ट्री.. जनतेनं नाकारलं जंगलराज अन्…
एकनाथ शिंदे यांनी बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या निकालावर भाष्य करताना सांगितले की, बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारून विकासराज स्वीकारले आहे. पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला मिळालेल्या या दणदणीत विजयाचे श्रेय महिला मतदारांना दिले जात आहे, ज्यामुळे महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही ऐतिहासिक यश मिळाले.
राज्याचे उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदेंनी बिहारमधील एनडीएच्या दणदणीत विजयावर भाष्य करताना म्हणाले की, बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारले असून विकासराज स्वीकारले आहे. यामुळे एनडीएला दणदणीत बहुमत मिळाले आहे. या विजयाचे श्रेय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि बिहारमधील महिला मतदारांना दिले.
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करून लँडस्लाईड विजय मिळवून दिला, त्याचप्रमाणे बिहारमध्येही महिला मतदारांच्या (लाडक्या बहिणी) योगदानातून हे यश मिळाल्याचे शिंदे यांनी नमूद केले. शिंदे यांनी सांगितले की, बिहारमध्ये मोदीजी आणि नितीश कुमार यांनी केलेल्या विकासकामांवर जनतेने विश्वास ठेवला. या निकालामुळे विकासराज सुरू राहणार असून, जंगलराजला जनतेने पूर्णपणे नाकारले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पूर्वीच्या जंगलराजमध्ये संध्याकाळी 6 नंतर लोकांना बाहेर पडणे कठीण होते आणि गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर होती, अशी आठवण त्यांनी करून दिली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

