Devendra Fadnavis PC | ओबीसींना आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही : देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन तीन मागण्या केल्या.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jun 23, 2021 | 6:30 PM

मुंबई :  देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेऊन तीन मागण्या केल्या. यामध्ये राज्य सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे, त्यामुळे अधिवेशनाचा काळ दोन दिवसाऐवजी पूर्ण अधिवेशन घ्यावं, विधानसभा अध्यक्षांची रखडलेली निवडणूक घ्यावी आणि ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देऊ नका, अशा मागण्या भाजपने राज्यपालांकडे केल्या. त्यानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“ओबीसी आरक्षण सरकारच्या नाकर्तेपणामुळ गेलं, गेल्या 40-50 वर्षात पहिल्यांदा ओबीसींना राजकीय आरक्षण या सरकारने ठेवलं नाही. आरक्षणाचा मार्ग निघेपर्यंत निवडणुका घेऊ नका असं सरकारने सांगितलं होतं, पण त्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. राज्यापालांना विनंती केली आहे की या निवडणुका पुढे ढकला. राज्य सरकारने ओबीसींबाबत विश्वासघात केला आहे,” असे फडणवीस म्हणाले.

तसेच “माझं आव्हान आहे, सरकारमधील ओबीसीच्या मंत्र्यांना आव्हान आहे, राज्य सरकारला अधिकार आहे, या मंत्र्यांनी राज्य सरकारला निवडणुका पुढे घ्यायला भाग पाडा. आम्ही आंदोलन करणार आहोतच, निवडणुका जर घेणार असाल तरीही भाजप या जागांवर केवळ ओबीसी उमेदवार देईल. निवडणूक जिंकलो हरलो काहीही होवो, ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजप पाठपुरावा करेल,” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें