जरा जरी खाली-वर झालं तर पंगा माझ्याशी… गेवराईत भाजप उमेदवाराची धमकी? VIDEO तुफान व्हायरल
बीडच्या गेवराई येथे भाजप नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार यांचा मतदारांना धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. घरकुल योजनेच्या हप्त्यांचा उल्लेख करत कमळाला मतदान न केल्यास कारवाईची धमकी त्यांनी दिल्याचे यात दिसत आहे. माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या भावजय असलेल्या गीता पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या शीतल दाभाडे उभ्या आहेत.
बीड जिल्ह्यातील गेवराई येथे भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार मतदारांना धमकावत असल्याचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गीता पवार मतदारांना घरकुल योजनेच्या हप्त्यांचा उल्लेख करत, कमळाला (भाजपचे निवडणूक चिन्ह) मतदान न केल्यास गंभीर परिणामांची धमकी देताना दिसत आहेत. “जरा जरी खाली वर झालं, माझ्याशी पंगा आहे मग. घरकुल दिलेलंय. एक-एक अशी झोडपीन सोडायची नाही,” असे शब्द त्या वापरत आहेत.
व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या गीता पवार या भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या भावजय आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) शीतल दाभाडे यांना उमेदवारी मिळाली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या घडामोडींमध्ये आणखी एका वादाची भर पडली आहे. मतदारांना धमकावल्याच्या या व्हिडिओबद्दल भाजपच्या उमेदवाराकडून संध्याकाळपर्यंत कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

