‘त्यांच्या’ चेहऱ्यावर कोण मतं देतं का? चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला नेमका कुणाला?

हर्षदा शिनकर

Updated on: Jan 24, 2023 | 2:19 PM

'बाळासाहेब ठाकरे हा एक विचार आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार भाजपमध्ये आहे. त्या विचाराला 'ते' धक्का पोहोचवत आहेत'

2019 साली झालेल्या निवडणुकीत विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा वापरल्याने मिळाला. तुमच्या चेहऱ्यावर निवडणुकीत कोण मतं देतं. बाळासाहेब ठाकरे हा एक विचार आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार भाजपमध्ये आहे. त्या विचाराला उद्धव ठाकरे धक्का पोहोचवत आहेत. अडीच वर्ष मुख्यमंत्री होते, काय केले? जनतेत जाऊन फिरा मग कळेल उद्धव ठाकरे यांचे हाल काय आहेत, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्रमक उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना दिली.

उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात झालेल्या युतीवर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे गटातून अनेक माणसं पक्ष सोडून जात आहेत. रोज पक्षप्रमुख होत आहेत. अशातच प्रकाश आंबेडकर यांच्यासह युती करून शिवसैनिक प्रचंड संतापले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे राहिलेली शिवसेना ते नष्ट करताय, अशी गंभीर टीकाही बावनकुळे यांनी केली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI