गेल्या चुकांची पुनरावृत्ती यंदा लोकसभा निवडणुकीत होणार? काय म्हणाले गुलाबरावांच्या वक्तव्यावर गिरीश महाजन?
मागच्या चुकांची पुनरावृत्ती पुढील काळात भाजपकडून होऊ नये, असं वक्तव्य शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते आमदार गुलाबराव पाटील यांनी करत भाजपवर निशाणा साधला होता. तर गुलाबराव पाटील यांना भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिलंय. काय म्हणाले गिरीश महाजन बघा...
गेल्या वेळी आम्ही लोकसभेची कामं केली पण विधानसभेत आमच्यासमोर भाजपने बंडखोर उमेदवार उभे केले. तर जागा वाटपाचा निर्णय हा पार्लिमेन्ट्री बोर्डाचा आहे. ज्यामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि अजित पवार यांचा समावेश आहे. जागावाटपाचा निर्णय आणि त्यावर शिक्कामोर्तब हे केंद्रात होतं. ९० जागांचं वाटप योग्यरितीने झालंय. पण १-२ जागांवर अडलंय. मागच्या काळात भाजपने कुठेही बंडखोर उभे केले नाही, असं गिरीश महाजन म्हणाले. तर कुठे बंडखोर उभे राहत असतील तर आपण आवरू शकत नाही. यावेळी कुठेही बंडखोरी होणार नाही, याची काळजी घेतली जाईल असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय.
Published on: Mar 31, 2024 01:52 PM
Follow Us
Latest Videos
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
