AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kishori Pednekar | भाजपला वाट्टेल ते बरळण्याचा अधिकार आहे बरळू दे : किशोरी पेडणेकर

Kishori Pednekar | “भाजपला वाट्टेल ते बरळण्याचा अधिकार आहे बरळू दे” : किशोरी पेडणेकर

| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 1:20 PM
Share

मालाडमध्ये झालेल्या दुर्घटनेची माहिती घेण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी भाजपकडून होत असलेल्या आरोपांबाबत महापौरांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

मालाडमध्ये झालेल्या दुर्घटनेची माहिती घेण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी भाजपकडून होत असलेल्या आरोपांबाबत महापौरांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजप काय म्हणतंय ना ते भौ भौ काय करायचं ते त्यांना करत राहू दे. कारण शिवसेना हे करते ते करते असं ते सांगत आहेत. हे अगदी दूध के धुले आहेत नो प्रॉब्लेम, असा चिमटा महापौरांनी काढला.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महापालिकेसह इतर प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. सध्या या ठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.