‘औरंगजेबाचा जप तोंडी, दाखवण्यासाठी रुद्राक्षाची माळ हाती… महाराष्ट्रातील ते हिंदुत्ववादी ढोंगी?’, भाजपच्या बड्या नेत्याचा ठाकरेंवर रोख
आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे. सभेत दाखवण्यापूर्ती हातात रुद्राक्षाची माळ घालतात, असं म्हणत आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलंय.
ढोंगी हिंदुत्ववादी म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे. सभेत दाखवण्यापूर्ती हातात रुद्राक्षाची माळ घालतात, असं म्हणत आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलंय. आशिष शेलारांनी ट्वीट करत उद्धव ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. ‘अयोध्येत प्रभू रामाचे भव्य मंदिर उभे राहिले महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर कोट्यवधी श्रध्दाळू दर्शन करुन आले. आमच्या छत्रपती संभाजी महाराजांवरील “छावा” सिनेमा आला. महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर जगभरातील कोट्यवधी लोकांनी तो पाहिला… ! “छावा” वर महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी आणि त्यांचा “सामना” सोडून जगभरातील लिहिणारे, बोलणारे बोलत आहेत.. स्वागत करीत आहेत. कुंभमेळा भरला.. महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर जगभरातील कोट्यवधी भाविक सहभागी होऊन पवित्र स्नान करुन आले’, असं म्हणत शेलारांनी घणाघात केला. पुढे ते असेही म्हणाले, सभेत दाखवण्यापुर्ती हातात रुद्राक्षाची माळ घाली…औरंगजेबाचा जप ज्यांच्या सदैव तोंडी… ओळखलेत का? महाराष्ट्रातील ते हिंदुत्ववादी ढोंगी ? असं म्हणत खोचक सवालही शेलारांनी केला आहे.
सामंतांच्या बॅगेची आयोगाकडून तपासणी, बॅगेत काय-काय? मंत्र्यानच सांगितल
...मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजितदादांवर ऐकरी भाषा अन्...
नितेश राणेंचे व्हिडीओ 11 तारखेला व्हायरल करू, सचिन अहिर यांचा निशाणा
मी टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीसांचा हल्लाबोल

