‘वाघनखं येणार कळताच नकली वाघ बिथरले’, भाजप नेत्याचा रोख नेमका कुणावर?

VIDEO | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमातील एक महत्त्वाचा घटक समजला जाणारी वाघ नखे याविषयी सध्या राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे, ब्रिटनवरून भारतात आणण्यात येणारी वाघनखं खरी आहे की खोटी? ती वाघनखं खरचं शिवरायांनी वापरली आहेत का? असा सवाल विरोधकांकडून होत असताना भाजप नेत्यानं कुणाला फटकारलं?

'वाघनखं येणार कळताच नकली वाघ बिथरले', भाजप नेत्याचा रोख नेमका कुणावर?
| Updated on: Oct 02, 2023 | 11:10 AM

मुंबई, २ ऑक्टोबर २०२३ | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमातील एक महत्त्वाचा घटक समजला जाणारी वाघ नखं भारतात परत येत असल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. शिवरायांनी वापरलेली वाघनखं लंडनहून १६ नोव्हेंबर रोजी भारतात परत आणण्यात येणार आहे. शिवरायांची वाघनखं ही तीन वर्ष भारतात असणार आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमातील एक महत्त्वाचा घटक समजला जाणारी वाघ नखे याविषयी सध्या राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपावर होताना दिसत आहे. तर आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला थेट सवाल करत स्पष्टीकरण मागितले आहे. ते म्हणाले, राज्यात आणण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांबाबत राज्य सरकारने स्पष्टता करावी, या संदर्भातील माहिती राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी सरकारकडे केली आहे. ती वाघनखं खरंच शिवरायांची आहे का? विरोधकांकडून होणाऱ्या अशा शंकावर भाजपचे नेते आशिष शेलार प्रत्युत्तर देत खोचक टोला लगावला आहे. ‘वाघनखे येणार कळताच नकली वाघ बिथरले’, असे म्हणत राऊत यांच्यासह ठाकरे गटावर शेलार यांनी टीका केली आहे.

Follow us
मोदींची नेमणूक का केली ? टोला की कौतूक ? वाडकर नेमकं काय म्हणाले
मोदींची नेमणूक का केली ? टोला की कौतूक ? वाडकर नेमकं काय म्हणाले.
भारताचं सामर्थ्य नवी भरारी घेणार,पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास
भारताचं सामर्थ्य नवी भरारी घेणार,पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास.
गेल्या दहा वर्षांत देशाला नैराश्यातून बाहेर काढले - पंतप्रधान
गेल्या दहा वर्षांत देशाला नैराश्यातून बाहेर काढले - पंतप्रधान.
पहिल्या तीन औद्योगिक क्रांतीत मागे पडलोय पण..., मोदींचं मोठं वक्तव्य
पहिल्या तीन औद्योगिक क्रांतीत मागे पडलोय पण..., मोदींचं मोठं वक्तव्य.
...तर देशात आशेचा संचार कसा होईल? नरेंद्र मोदी यांचं रोखठोक प्रतिपादन
...तर देशात आशेचा संचार कसा होईल? नरेंद्र मोदी यांचं रोखठोक प्रतिपादन.
WITT : मोदी यांच्याकडून tv9 नेटवर्कच्या कामाचे कौतुक, म्हणाले...
WITT : मोदी यांच्याकडून tv9 नेटवर्कच्या कामाचे कौतुक, म्हणाले....
हीच योग्य वेळ... कंगना राणावत लोकसभा लढवणार? मनातलं जाहीरपणे मांडलं
हीच योग्य वेळ... कंगना राणावत लोकसभा लढवणार? मनातलं जाहीरपणे मांडलं.
'फडणवीस यांच्याविरोधात एक शब्दही...,' काय म्हणाले प्रवीण दरेकर
'फडणवीस यांच्याविरोधात एक शब्दही...,' काय म्हणाले प्रवीण दरेकर.
'जरांगे कधी खोटं बोलत नाहीत, त्यांनी...,' काय म्हणाले कैलास गोरंट्याल
'जरांगे कधी खोटं बोलत नाहीत, त्यांनी...,' काय म्हणाले कैलास गोरंट्याल.
'फडणवीस तुम्ही काल चक्रव्युह रचला पण...,' काय म्हणाले मनोज जरांगे
'फडणवीस तुम्ही काल चक्रव्युह रचला पण...,' काय म्हणाले मनोज जरांगे.