AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vishal Patil Video : विशाल पाटील भाजपमध्ये येणार? चंद्रकांत पाटलांनी दिलेल्या खुल्या ऑफरवर स्पष्टच म्हणाले,'विचार जरी वेगळे असले तरी...'

Vishal Patil Video : विशाल पाटील भाजपमध्ये येणार? चंद्रकांत पाटलांनी दिलेल्या खुल्या ऑफरवर स्पष्टच म्हणाले,’विचार जरी वेगळे असले तरी…’

| Updated on: Mar 16, 2025 | 5:23 PM

चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिल्यानंतर काँग्रेसमधून बंडखोरी केलेले खासदार विशाल पाटील हे भाजपात येणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे

भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केलेले खासदार विशाल पाटील यांना थेट भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर देत राजकारणात नेहमी वर्तमानावर चालावं लागतं. पुढे काय होणार माहिती नाही, वर्तमानामध्ये विशाल पाटलांकडे चार वर्ष दोन महिने आहेत. त्यामुळे विशाल पाटील यांच्याकडे असणाऱ्या चार वर्ष दोन महिन्यांचा आम्ही विचार करतोय, असं म्हटलं आहे. इतकंच नाहीतर विशाल पाटील आमच्या बरोबर आले तर आमची केंद्रातील एक संख्या वाढते आणि सांगलीच्या विकासासाठी विशाल पाटलांनी या ऑफरचा विचार करावा, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तर चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटील यांना जाहीरपणे दिलेल्या ऑफर त्यांनी स्पष्टच म्हटलं, ‘माझ्या कामाची पद्धत त्यांना आवडली असल्यामुळे त्यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली असेल. राजकीय विचार आमचे विचार वेगळे असले तरी ते जेष्ठ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी मला जर अशी ऑफर दिली असेल तर ती आमच्या कामाची पोचपावती असेल’, असंही विशाल पाटील म्हणाले.

Published on: Mar 16, 2025 05:23 PM