हिंमत असेल तर एक ‘रोखठोक’ त्यावरही येऊ द्या…, चंद्रशेखर बावनकुळेंचं संजय राऊतांना चॅलेंज
संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे कर्मचारी आहेत पण शरद पवारांची चाकरी करतात. राऊत भ्रमिष्ट अवस्थेत रोखठोक लिहित असावेत. भाजप पक्ष नाही तर परिवार आहे. ज्यांनी आयुष्यभर गटातटाचं राजकारण केलं त्या राऊतांना परिवार काय कळणार? भाजपच्या बड्या नेत्याचा संजय राऊतांवर हल्लाबोल
संजय राऊत भ्रमिष्ट अवस्थेत रोखठोक लिहित असावेत. इतकंच नाहीतर संजय राऊत यांनी सामनातील रोखठोकमधून आकलेचे तारे तोडले, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. तर गटातटाचं राजकारण करणाऱ्या संजय राऊत यांना परिवार काय कळणार? असा सवाल देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊतांवर भाष्य करताना केला आहे. ‘संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे कर्मचारी आहेत पण शरद पवारांची चाकरी करतात. राऊत भ्रमिष्ट अवस्थेत रोखठोक लिहित असावेत. भाजप पक्ष नाही तर परिवार आहे. ज्यांनी आयुष्यभर गटातटाचं राजकारण केलं त्या राऊतांना परिवार काय कळणार? 2019 मध्ये स्वतः सीएम होण्यासाठी राऊतांनीही प्रयत्न केले होते. पण राऊतांचा डाव यशस्वी झाला नाही. हिंमत असेल तर एक रोखठोक त्यावरही येऊ द्या…’, असे म्हणत बावनकुळेंनी राऊतांना चॅलेंज दिलंय.
![चिमुकली केया आता दिसणार मोठ्या पडद्यावर...; दिग्गज कलाकारच्या सिनेमात झळकणार चिमुकली केया आता दिसणार मोठ्या पडद्यावर...; दिग्गज कलाकारच्या सिनेमात झळकणार](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/cropped-Child-Artist-Keya-Ingle-5.jpg?w=670&ar=16:9)
![मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेची नेपाळ सफर; पहा Unseen फोटो मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेची नेपाळ सफर; पहा Unseen फोटो](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/Mugdha-Vaishampayan-and-Prathamesh-Laghate.jpg?w=670&ar=16:9)
![उपाशी पोटी डाळिंबाचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी धोकादायक? जाणून घ्या अत्यंत महत्वाचे... उपाशी पोटी डाळिंबाचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी धोकादायक? जाणून घ्या अत्यंत महत्वाचे...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/pomegranate-juice-7.jpg?w=670&ar=16:9)
![लसूण खाण्याचे 'हे' आहेत अत्यंत मोठे फायदे लसूण खाण्याचे 'हे' आहेत अत्यंत मोठे फायदे](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/garlic.jpg?w=670&ar=16:9)
![एका वर्षात 1 लाखाचे झाले 35 लाख, या कंपनीने केली कमाल एका वर्षात 1 लाखाचे झाले 35 लाख, या कंपनीने केली कमाल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/cropped-Multibagger-Stock-Share-Market-TRIL-Company.jpg?w=670&ar=16:9)
![माणसाने इतकंही...; सई ताम्हणकरच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या कमेंट माणसाने इतकंही...; सई ताम्हणकरच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या कमेंट](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/cropped-Sai-tamhankar-10.jpg?w=670&ar=16:9)