सुषमाताई…. मातोश्रीतील सरडेही आत्महत्या करतील, चित्रा वाघ यांचं झोंबणारं विधान काय?
सुषमाताई…. तुमच्या बाबतीत तर कित्येक सरडे दररोज आत्महत्या करतात, असं वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी करत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर खोचक टीका केली आहे. तर फार मातोश्रीवर चकरा मारु नका, नाहीतर तेथील सरडेही आत्महत्या करतील, असा टोलाही लगावला
मुंबई, ७ डिसेंबर २०२३ : सुषमाताई…. तुमच्या बाबतीत तर कित्येक सरडे दररोज आत्महत्या करतात, असं वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी करत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर खोचक टीका केली आहे. तर हिंदू देवी-देवतांबद्दल घाणेरडी विधाने करणे, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची टिंगल उडविणे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे बद्दल तुम्ही केलेली विधाने विसरलात की काय..? असे म्हणत चित्रा वाघ यांनी सुषमा अंधारेंना सवाल केलाय. चित्रा वाघ पुढे असेही म्हणाल्या की,आज तुम्ही त्यांचेच गोडवे गाताय, मान्य आहे… मातोश्रीभोवती असे सरडे नियमित फिरत असतात. फार मातोश्रीवर चकरा मारु नका, नाहीतर तेथील सरडेही आत्महत्या करतील, असा खोचक टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.
Latest Videos
Latest News