… तेंव्हा किती खोटे गुन्हे दाखल केले, चित्रा वाघ यांचा आव्हाडांवर पटलवार
आव्हाडांवर एका एका महिलेने आरोप केल्यानंतर त्यांनी समाजमाध्यमावर हा व्हीडिओ बनवला. त्यावर आपलं म्हणणं मांडताना दिसत आहेत. तसेच आपल्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचा डाव आखला जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
सोलापूर : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी जो गुन्हा मी केला नाही त्याची शिक्षा मी का भोगू? असा सवाल केला आहे. त्यावेळी त्यांच्या एका हातात कुराण तर दुसऱ्या हातात भगवद्गीता आहे. यावरून आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पलटवार करत आव्हाडांवर टीका केली आहे.
आव्हाडांवर एका एका महिलेने आरोप केल्यानंतर त्यांनी समाजमाध्यमावर हा व्हीडिओ बनवला. त्यावर आपलं म्हणणं मांडताना दिसत आहेत. तसेच आपल्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचा डाव आखला जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी जे मी केलं नाही त्याची शिक्षा मी का भोगू? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी या व्हिडीओतून विचारला आहे.
यावर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. जितेंद्र आव्हाड यांनी आत्मचिंतन करावे. महाविकास आघाडी सरकार काळात आमच्यावर किती खोटे गुन्हे दाखल केले. तेव्हा आम्ही काही बोललो नाही. आमच्या कुटुंबावर गुन्हे दाखल केले तेव्हा आम्ही आमचा संविधानवर विश्वास आहे हेच सांगत होतो, असं त्या म्हणाल्या.

