Chitra Wagh : ‘…म्हणून विलासराव देशमुखांनी मंत्री केलं नाही’; चित्रा वाघांनी ट्विट केला नितीन राऊतांचा ‘तो’ व्हिडीओ
भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी नितीन राऊत यांचा एक व्हिडीओ ट्विटरवर ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये जय भीम म्हटलं म्हणून विलासराव देशमुख यांनी मंत्री केलं नाही, असं नितीन राऊत एका सभेत बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ ट्वीट करताना चित्रा वाघ यांनी त्यावर काही लिहिले देखील आहे
काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी नितीन राऊत यांचा एक व्हिडीओ ट्विटरवर ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये जय भीम म्हटलं म्हणून विलासराव देशमुख यांनी मंत्री केलं नाही, असं नितीन राऊत एका सभेत बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ ट्वीट करताना चित्रा वाघ यांनी त्यावर काही लिहिले देखील आहे. काँग्रेसची संस्कृती नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधी आहे. एका भाषणामध्ये काँग्रेसचे नेते नितीन राऊत सांगतात, की केवळ ‘जय भीम’ म्हटले म्हणून विलासराव देशमुखांनी मंत्री केले नाही. अहो, नितीनजी यात नवीन काय आहे ? प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या काँग्रेसवाल्यांनी दोनदा निवडणुकीमध्ये पाडले, त्यांच्याकडून कसली अपेक्षा करता? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला. तर पुढे त्या असंही म्हणाल्या, यांचा मूळ चेहरा आरक्षणविरोधी, मागासवर्गीयांच्या विरोधी आणि फक्त मुस्लिमांचे तुष्टीकरण करणारा आहे, त्यांच्याकडून तुम्हालाच काय भारतात कोणालाच न्याय मिळणार नाही. पूर्वीपासून हीच आहे काँग्रेसची संस्कृती आहे, असे चित्रा वाघ यांनी म्हटलंय.
Published on: Nov 17, 2024 02:15 PM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
