3 Marksheet जुळवूनही BJP पहिली आली – Devendra Fadnavis

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: वैजंता गोगावले, Tv9 मराठी

Updated on: Mar 20, 2022 | 7:09 PM

आज देवेंद्र फडणवीस मावळ तालुक्यात बैलगाडा शर्यतीला गेले होते. त्यांनी या शर्यतीत धावणाऱ्या बैलगाड्यांच्या नंबरचा आधार घेत पुन्हा महाविकास आघाडीविरोधात जोरदार टोलेबाजी केलीय. मी ठरवलं की नंबर 1 येतोच, मात्र महाविकास आघाडीचे नेते तीन मार्कशीट जूळवून पहिले आले, असा खोचक टोला फडणवीसांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

मुंबई : पाच राज्यातील निवडणूक निकालात (Five State Election result 2022) मोठं यश मिळाल्यानंतर भाजप नेते सतत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) डिवचत आहेत. फडणवीसही गेल्या काही दिवसांपासून जबरदस्त कॉन्फिडंट झाले आहेत. आज देवेंद्र फडणवीस मावळ तालुक्यात बैलगाडा शर्यतीला गेले होते. त्यांनी या शर्यतीत धावणाऱ्या बैलगाड्यांच्या नंबरचा आधार घेत पुन्हा महाविकास आघाडीविरोधात जोरदार टोलेबाजी केलीय. मी ठरवलं की नंबर 1 येतोच, मात्र महाविकास आघाडीचे नेते तीन मार्कशीट जूळवून पहिले आले, असा खोचक टोला फडणवीसांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी फडणवीसांनी आत्तापासूनच सुरू केलीय. गेल्या विधानसभा निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरूनही सत्तेतून बाहेर आहे. मात्र तीन पक्षांनी एकत्र येत बहुमत जुळवल्यामुळे फडणवीसांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंगलं आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI