Kirit Somaiya | भावना गवळींकडे 7 कोटी कुठुन आले? : किरीट सोमय्या

भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर चांगलाच हल्ला बोल केला. तसंच पुढील आठवण्यात अजून एका कॅबिनेट मंत्र्याचे घोटाळे कागदपत्रांसह लोकांसमोर आणणार असल्याचा इशाराही सोमय्या यांनी यावेळी दिला.

Kirit Somaiya | भावना गवळींकडे 7 कोटी कुठुन आले? : किरीट सोमय्या
| Updated on: Sep 09, 2021 | 4:19 PM

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. सोमय्या यांनी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय. पुण्यात पत्रकार परिषदेत अजित पवारांपासून सुरुवात करायची की शरद पवारांपासून या संभ्रमात असल्याचा खोचक टिप्पणीही यावेळी केली. पुढील आठवण्यात अजून एका कॅबिनेट मंत्र्याचे घोटाळे कागदपत्रांसह लोकांसमोर आणणार असल्याचा इशाराही सोमय्या यांनी यावेळी दिला.

परिवहन मंत्री अनिल परब आणि त्यांचे निकटवर्ती मानले जाणारे आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या संदर्भातील एका याचिकेवर पुढील महिन्यात लोकायुक्तांसमोर आहे. दोन ते तीन आठवड्यात पहिली कारवाई होणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय. अनिल परब यांचं अनधिकृत रिसॉर्ट पाडण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. मग तरीही अनिल परब मंत्रिमंडळा कसे? असा सवाल सोमय्या यांनी यावेळी केलाय. तसंच शरद पवार सर्टिफिकेट देतात की भावना गवळी निर्दोष आहेत. सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी अतिक्रमण करते, हैराण करते. तर भावना गवळी यांनी 40 वेळा बँकेतून पैसे काढले आहेत. 21 लाखापेक्षा कमी पैसे काढले नाहीत. रिसोर्स अर्बन क्रेडिट सोसायटीमधून पैसे काढले. अन् शरद पवार म्हणतात की ईडी चौकशी का करते? एकूण 118 कोटींचा घोटाळा आहे. शरद पवारांना भावना गवळी यांना वाचवायचं असेल तर त्यांनी सांगावं, असा खोचक टोलाही सोमय्यांनी पवारांना लगावलाय.

Follow us
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.