Mohit Kamboj | भाजप नेते मोहित कंबोजकडून अब्रुनुकसानीची मंत्री नवाब मलिकांवर दावा

भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्यावर केले गंभीर आरोप, नवाब मलिक यांच्या सांगण्यावरून प्रभाकर साईल हे समीर वानखेडेवर आरोप करत असल्याचे मोहित भारतीय कंबोज यांनी सांगितले. 

भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्यावर केले गंभीर आरोप, नवाब मलिक यांच्या सांगण्यावरून प्रभाकर साईल हे समीर वानखेडेवर आरोप करत असल्याचे मोहित भारतीय कंबोज यांनी सांगितले. मोहित कंबोजने आज एक व्हिडिओ ट्विट केला असून त्या व्हिडिओवर लिहिले आहे, ‘नोटरी राम जी गुप्ता यांचे स्ट्रिंग ऑपरेशन : रामजी म्हणतात #प्रभाकर साइलने हे सर्व किरण गोसावीकडून पैशासाठी केले आहे! यामागे मियाँ नवाब आणि मनोज असल्याचे स्पष्टपणे सांगत आहे!’  मोहित कंबोज म्हणाले की, मी एका काळ्या टी-शर्टचा उल्लेख केला होता, त्याचे नाव कुणाल जैन आहे, ज्याचे बॉलिवूड आणि महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांशी चांगले संबंध आहेत, मी लवकरच त्याचा खुलासा करणार आहे. प्रभाकर साईल गोसावी यांच्याकडे पैसे मागितले होते, त्यांनी ते पैसे दिले नाहीत, तेव्हा नवाब मलिक यांच्या सांगण्यावरून आरोप करत आहेत. आज मी नवाब मलिक यांच्या विरोधात न्यायालयात जाणार आहे, मानहानीचा खटला दाखल करणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI