AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भिवंडीत कपिल पाटलांच्या गोलंदाजीवर रावसाहेब दानवेंची फटकेबाजी

| Edited By: | Updated on: Mar 04, 2022 | 11:03 AM
Share

या सामन्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, मात्र पाटलांनी दाजींची विकेट काढली का, याबाबत समर्थकांना लागलेली उत्सुकता व्हिडीओमध्ये तरी शमत नाही.

मोदी सरकारमध्ये राज्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणारे दोन मराठमोळे खासदार ठाणे जिल्ह्यात क्रिकेटच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) नेहमी ‘बोलं’दाजी करताना पाहायला मिळतात, मात्र यावेळी त्यांनी तुफान फलंदाजी केल्याचं पाहायला मिळालं. तर दाजी अर्थात दानवेंची विकेट काढण्यासाठी भिवंडीचे भाजप खासदार सज्ज होते. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांनी गोलंदाजी केली. भिवंडीतील मैदानात रंगलेल्या या सामन्यात (Cricket Match) कपिल पाटील यांनी टिच्चून बोलिंग केली, मात्र बराच वेळ दानवेंची विकेट काढणं त्यांना शक्य झालं नाही. कारण रावसाहेब एकामागून एक फटके मारतच होते. या सामन्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, मात्र पाटलांनी दाजींची विकेट काढली का, याबाबत समर्थकांना लागलेली उत्सुकता व्हिडीओमध्ये तरी शमत नाही.