Nitesh Rane Video : ‘शिवसैनिक पण सामना वाचत नाही, तो फक्त सकाळी पुसण्यासाठी…’, राऊतांवर भाष्य करताना नितेश राणेंचा टोला
'पहिल्या दिवसापसून संजय राजाराम राऊत दुसऱ्याच्या घरात डोकावण्याचं काम करतोय. त्यामुळे दुसऱ्याच्या घरात डोकावण्यापेक्षा स्वतःच्या पक्षात काय चाललंय ते पहावं.'
एकनाथ शिंदे मनाने कोलमडले, एकनाथ शिंदे हे समाधी अवस्थेकडे पोहोचले असं शिवसेनेच्या आमदारानं विमान प्रवासात सांगितल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आणि रोखठोकमधून मोठा गौप्यस्फोट केला. यावरच भाजप नेते नितेश राणेंनी भाष्य केले आहे. ‘शिंदे काय करताय? भाजपात काय चाललंय? पहिल्या दिवसापसून संजय राजाराम राऊत दुसऱ्याच्या घरात डोकावण्याचं काम करतोय. त्यामुळे दुसऱ्याच्या घरात डोकावण्यापेक्षा स्वतःच्या पक्षात काय चाललंय ते पहावं. स्वतःच्या पक्षात स्वतः स्थान आणि स्वतःच्या मालकाच्या पक्षात अजून किती काळ राहणार याबद्दल संजय राजाराम राऊत यांनी महाराष्ट्राला उत्तर द्यावं’, असं म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊत यांना फटकारल्याचे पाहायला मिळाले. पुढे ते असेही म्हणाले, सध्या उबाठामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्याबद्दल मातोश्रीमध्ये जाऊन विचारा… संजय राजाराम राऊत यांच्यापासून अस्वस्थता सुरू आहे. सामनाचे सो कॉल्ड कार्यकारी संपादक हे आता किती काळ उबाठामध्ये राहतील हे आता हाताच्या बोटावर तुम्ही मोजा… असंही नितेश राणे म्हणाले. मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने मातोश्रीवर काळी जादू केली जातेय, असं म्हणत सामनातील रोखठोकवरून नितेश राणे यांनी राऊतांना हा टोला लगावला आहे. सामना हे वृत्तपत्र शिवसैनिकपण वाचत नाही ते फक्त सकाळी पुसायला वापरतात… कारण सामना हे शिवसेनेचं नाही तर आता काँग्रेसचं मुखपत्र झालं आहे, असं म्हणत नितेश राणे यांनी खोचक टीका केली.

भेटायला जायला ते काय आयसीयूत गेले होते की कोमात? मनोज जरांगे संतापले

संतोष देशमुख लढा आणि मुंडेंची तब्येत वेगळी...,' काय म्हणाले सुरेश धस

वाल्मिक कराडची बी टीम सक्रीय आहे..,' काय म्हणाले धनंजय देशमुख

आरबीआयने आणले या बँकेवर निर्बंध, मुलांचे लग्न, घराचे हप्ते सर्वच रखडले
