‘कोकणावर लागलेला कलंक म्हणजे विनायक राऊत’, भाजप नेत्याचा हल्लाबोल
VIDEO | 'संसदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांना दाखवली औकात', असे म्हणत भाजप नेत्याचा प्रहार
सिंधुदुर्ग, १० ऑगस्ट २०२३ | ‘विनायक राऊत हे कोकणाला लागलेला कलंक आहे’, अशा शब्दात भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. विनायक राऊत यांनी नारायण राणे यांनी केलेल्या संसदेतील भाषणावर चांगलीच टीका केली होती. त्याला उत्तर देताना नितेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. नितेश राणे म्हणाले की, कोकणावर लागलेला कलंक म्हणजे विनायक राऊत आहे. संसदेत नारायण राणे यांनी उबाटा आणि उद्धव ठाकरे यांची औकात दाखवली, त्यामुळे त्यांना मिरच्या झोबंल्या आणि संपलेल्या खासदारांचे थोबाड उघडले, असल्याचे म्हणत ठाकरे गटावर घणाघात केला. तुम्हाला वेळ असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नारायण राणे यांच्यावर किती अभिमान आहे. ते त्यांच्या मंत्रालयात जाऊन विचारा असे म्हणत कोकणावर लागलेला कलंक आम्ही 2024 ला पुसून टाकणार असल्याचे म्हणत त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?

