‘यांना कानाखाली नाही मारायची मग काय पुजा करायची ?’; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितेश राणे आक्रमक
बुधवारी मुंबईमध्ये शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला. मात्र त्यांच्या एका वक्तव्यावरून नितेश राणेंनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
मुंबई : बुधवारी मुंबईमध्ये शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली. मात्र यावेळी बोलत असताना त्यांनी एक मे शिवजयंती असा उल्लेख केला होता. यावरून भाजप नेते नितेश राणे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंचा हा व्हिडीओ पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. यांना कानाखाली नाही मारायची मग काय यांची पुजा करायची? असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिले आहे. तर दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधाला आहे. बुधवारी झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना नेते संजय राऊत यांची खुर्ची खाली होती. यावरून संदीप देशपांडे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. ‘उद्या तुमचीही खुर्ची खाली असेल तयारी ठेवा’ असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
Published on: Sep 22, 2022 08:26 AM
भिवंडीत गॅस पाईपलाईनला गळती; जेसीबीच्या धक्का लागताच...
पाढरी पट्टी प्रकरणात मोठी अपडेट! 'आम्ही काही बांगड्या घातलेल्या नाहीत
विरारच्या रिसॉर्टमध्ये मोठा राडा! खुर्च्या, दांडे आणि ड्रमने दोन....
बसू द्या 8-10 दिवस, CCTV लावा अन्... रोहित पवारांच्या अन्नत्यागावर...

