Nitesh Rane Video : नितेश राणे यांची सैफच्या हल्ल्यावर शंका, 'मला संशय, सैफला खरंच चाकू मारला की...'

Nitesh Rane Video : नितेश राणे यांची सैफच्या हल्ल्यावर शंका, ‘मला संशय, सैफला खरंच चाकू मारला की…’

| Updated on: Jan 23, 2025 | 12:40 PM

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय निरुपम यांनी सैफ अली खानच्या चाकू हल्ल्यावर संशय व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी या हल्ल्यावर भाष्य करत संशय व्यक्त केला आहे.

सैफ अली खानला बघितल्यावर मलाच संशय आला. खरंच चाकू मारला की अॅक्टिंग होती… असं वक्तव्य करत भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून शंका व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून एका बांग्लादेशी चोराने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. सुदैवाने तो या हल्ल्यातून बचावला. सहा दिवसांच्या उपचारानंतर सैफ अली खान याला लिलावती रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय निरुपम यांनी सैफ अली खानच्या चाकू हल्ल्यावर संशय व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी या हल्ल्यावर भाष्य करत संशय व्यक्त केला आहे. “बांग्लादेशी सैफ अली खानच्या घरात घुसले. नालायकपणा किती आहे. आधी फक्त नाक्यावर उभे रहायचे. आता घरात घुसायला लागले आहेत. कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील. सैफ बाहेरुन असा चालत होता की, मलाच संशय आला याला खरच कोणी चाकू मारला की हा अॅक्टिंग करुन बाहेर पडला. असं टुणटुण करुन” असं नितेश राणे यांनी म्हटले. तर ‘डॉक्टरांनी म्हटलं होतं की सैफ अली खानच्या पाठीत 2.5 इंच आतमध्ये चाकू घुसला होता. कदाचित तो चाकू आत अडकला असावा. सलग सहा तास शस्त्रक्रिया झाली. हे सर्व 16 जानेवारी रोजी घडलं. आज 21 जानेवारी आहे. रुग्णालयातून बाहेर पडताच सैफ इतका फिट? तेसुद्धा फक्त पाच दिवसात? कमाल आहे,’ असं संजय निरुपम यांनी म्हटलं होतं.

Published on: Jan 23, 2025 12:40 PM