Nitesh Rane Video : ‘… नाहीतर कपडे फाडून घरी पाठवू’, नितेश राणेंनी विजय वडेट्टीवारांवर हल्लाबोल करत काढली लायकी
नरेंद्र महाराजांबद्दल एकेरी बोलण्याची विजय वडेट्टीवार यांची लायकी तरी आहे का? असा सवाल करत नितेश राणे यांनी विजय वडेट्टीवार यांची लायकीच काढली आहे. इतकंच नाहीतर हिंमत असेल तर नाणीजमध्ये जाऊन त्यांनी नरेंद्र महाराजांबद्दल एकेरी बोलून दाखवावं, असं आव्हानच नितेश राणे यांनी दिलं आहे.
काँग्रेसवाले हिंदू द्वेषी आहेत, असं म्हणत राज्याचे बंदर विकास मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे यांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. वारंवार काँग्रेसवाल्यांमध्ये हिंदू द्वेष दिसतो. त्यातलाच भाग म्हणजे विजय वडेट्टीवार आहे, असं वक्तव्य करत नितेश राणे यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. तर नरेंद्र महाराजांबद्दल एकेरी बोलण्याची विजय वडेट्टीवार यांची लायकी तरी आहे का? असा सवाल करत नितेश राणे यांनी विजय वडेट्टीवार यांची लायकीच काढली आहे. इतकंच नाहीतर हिंमत असेल तर नाणीजमध्ये जाऊन त्यांनी नरेंद्र महाराजांबद्दल एकेरी बोलून दाखवावं, असं आव्हानच नितेश राणे यांनी दिलं आहे. पुढे नितेश राणे असेही म्हणाले, कोकणात आले तर कपडे फाडून विजय वडेट्टीवारांना कोकणातून परत पाठवू. त्यामुळे लायकी आहे तेवढं आणि पगार आहे तेवढेच बोल नाहीतर महाराष्ट्रात फिरणं अवघड होईल, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांच्यावर नितेश राणे यांनी जिव्हारी लागणारी टीका केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्र महाराज यांचे कार्य पाहावे तेवढे काम करायला यांना शंभर जन्म घ्यावे लागतील, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

