AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Swargate Rape Case : डॉग स्कॉड अन् ड्रोन! तरूणीवर दोनदा बलात्कार करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचा कसून शोध

Swargate Rape Case : डॉग स्कॉड अन् ड्रोन! तरूणीवर दोनदा बलात्कार करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचा कसून शोध

| Updated on: Feb 27, 2025 | 6:02 PM
Share

पुणे पोलिसांनी गाडेशी संबंधित 10 जणांची चौकशी केली आरोपीच्या शोधासाठी पोलिसांकडून आता डॉग स्कॉडसह ड्रोनची देखील मदत घेतली जात आहे. स्वारगेट बस डेपोत तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे दोन दिवसानंतर ही फरार आहे.

पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडे फरार असून पोलिसांची पथकं त्याच्या मागावर आहेत तर आरोपी गाडे कडून तरुणीवर दोन वेळा अत्याचार केल्याचा वैद्यकीय अहवाल समोर आहे. पुणे पोलिसांनी गाडेशी संबंधित 10 जणांची चौकशी केली आरोपीच्या शोधासाठी पोलिसांकडून आता डॉग स्कॉडसह ड्रोनची देखील मदत घेतली जात आहे. स्वारगेट बस डेपोत तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे दोन दिवसानंतर ही फरार आहे. आरोपी गाडेने पिडीत तरुणीवर दोन वेळा अत्याचार केल्याचं समोर आले आहे. आरोपी गाडे हा मुळचा शिरूर तालुक्यातील गुनाट या गावाचा रहिवासी आहे. स्वारगेट बस स्थानकात अत्याचार केल्यानंतर आरोपी थेट स्वतःच्या घरी गेला होता. शर्ट बदलून तो घराच्या बाहेर पडला. आसपासच्या नागरिकांनी दत्तात्रय गाडेला पाहिल्याची माहिती दिली आहे. सकाळी 11 वाजता तो त्याच्या घरी आला होता. पाच वाजेपर्यंत या ठिकाणी होता. मात्र पाच वाजल्यानंतर खरंतर हा गुन्हा दाखल झाल्यानंतर दत्तात्रय गाडे फरार झाल्याची माहिती आहे. मात्र आरोपीने परिवारातील सदस्यांना किंवा मित्रांना संपर्क केला का याचा तपास सुरू आहे.

पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडेच्या मैत्रिणीची ही चौकशी केली आहे. दत्तात्रय गाडे मैत्रिणीला सतत फोन आणि मेसेज करत होता ही माहिती मिळतेय दुसर्‍या एका तरुणीशी पॅचअप करून दे अशी मागणी गाडेने केल्याची माहिती तरुणीने दिली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे हा ऊसांच्या शेतात लपून बसल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी ड्रोनची देखील मदत घेतली आहे. दरम्यान गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वारगेट बस स्थानकाची पाहणी केली आहे.

Published on: Feb 27, 2025 06:02 PM